Browse By

आता लवकरच ‘मराठी Bigg Boss’ येणार आपल्या भेटीला, हा अभिनेता करू शकतो सूत्रसंचालन.

२००६ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा ११व्या पर्वाचा प्रवास काल संपला. हिंदी टीव्हीवरील प्रचंड लोकप्रिय असलेला बिग बॉसचं तमिळ वर्जनही खूप गाजलं. अन् आता बिग बॉस पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांसाठी लवकरच मराठी बिग बॉस सुरु होणार असल्याची अधिकृत घोषणा सलमान खाननं बिग बॉस ११च्या ग्रँड फिनालेमध्ये केली. मराठी बिग बॉस चे चित्रीकरण लोणावळा मध्ये असलेल्या घरातच केले जाणार आहे.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘अंगुरी भाभी’ अर्थात मराठमोळ्या शिल्पा शिंदेनं ‘बिग बॉस ११’ चे जेतेपद पटकावलं. मराठी प्रेक्षकांचा बिग बॉसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून मराठी बिग बॉस सुरू करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

मराठी बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठमोळा आणि सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखकडं दिली जाण्याची शक्यता आहे. रितेशनं याआधी ‘विकता का उत्तर’ या टीव्ही शोचं सूत्रसंचालनही केलं होतं.

मराठी कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी मराठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळं या कलाकारांना बिग बॉसच्या घरात पहाणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. ‘बिग बॉस’ आणि सेलिब्रिटींमधील वाद हे समीकरणचं असल्यानं मराठी बिग बॉसमध्येही टोकाचे वाद रंगणार का? की आणखी काही वेगळं पाहायला मिळतयं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *