Browse By

‘त्या’ ट्वीटमुळे हार्दिक पंड्यावर FIR चा आदेश दिला, तरीही त्याला काहीच होणार नाही.

टिम इंडियाचे फास्ट बॉलर महोम्मद शमी आजकाल पोलिस स्टेशन, कोर्टच्या चकरा मारत आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. शमी चा वाद शांत होण्यापूर्वीच दूसरा एक क्रिकेटर वादाच्या भोवर्‍यात आडकला, तो म्हणजे ऑलराऊंडर ‘हार्दिक पांडया’. जोधपुरच्या एका कोर्टाने हार्दिक पांडया विरोधात FIR फाडण्याचे आदेश दिले आहेत.

पण हा सर्व प्रकार आहे काय? 

हार्दिक पांडया वर आरोप आहे की, त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विवादीत ट्वीट करून समजबांधवांच्या भावना दुखावल्या. Adv. डी. आर. मेघवाल  यांनी हार्दिक पांडया विरोधात ही तक्रार केली होती. तक्रारीमद्धे असे सांगण्यात आले आहे की हार्दिक पांडयाने 26 डिसेंबर 2017 रोजी एका ट्वीट मध्ये बाबासाहेबांचा अपमान केला व आरक्षणावर आणि संविधानावर टीका केली. 

तक्रार दाखल करताना त्यांनी 26 डिसेंबर च्या ट्वीटचा Screenshot सोबत जोडला होता.

पण सुरुवातीलाच ही माहिती समोर आली आहे की ज्या ट्विट्टर अकाऊंटवर हे ट्वीट केले आहे ते अकाऊंट फेक आहे.  अश्या बर्‍याच क्रिकेटर्सचे पैरडी अकाऊंट ट्विट्टरवर आहेत. हार्दिक पांडयाचे official अकाऊंट  @hardikpandya7 हे असून विवादीत ट्वीट @sirhardik3777 या अकाऊंटवर करण्यात आले आहे.

मीडियावर हार्दिक पांड्याच्या तक्रारीच्या बातम्या पसरायला सुरुवात झाल्यावर त्याने आपल्या official अकाऊंटवर एक निवेदन पोस्ट केले आहे.

‘मीडियात आज दिशाभूल करणाऱ्या अनेक बातम्या पसरल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे ट्विट मी केल्याचा आरोप त्यातून झाला. मात्र, यात कोणतंही तथ्य नसून अशाप्रकारचं कोणतंही विधान मी ट्विटर वा अन्य कोणत्याही माध्यमातून केलेलं नाही. ज्या ट्विटवरून काहूर माजलं आहे ते ट्विट माझ्या नावाच्या एका बनावट अकाऊंटवरून करण्यात आलेले आहे’, असे पंड्याने स्पष्ट केले. ट्विटरवर माझं व्हेरिफाइड अकाऊंट असून त्या अकाऊंटच्या माध्यमातूनच मी नेहमी संवाद साधत आलो आहे, असेही पंड्याने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताची राज्यघटना आणि भारतातील विविध जनसमुदायांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. माझ्यामुळे कुणी दुखावलं जाईल, असे विधान मी करणं शक्य नाही वा अशा कोणत्याही वादात मी पडत नाही. केवळ चाहत्यांशी संवाद साधण्यासाठीच मी सोशल मीडियाचे व्यासपीठ वापरतो, असेही पंड्याने पुढे स्पष्ट केले.

हे ट्विट माझे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी मी आवश्यक पुरावे कोर्टाकडे सादर करेन तसेच माझ्याविरोधातील याचिका मागे घेण्याची विनंती करेन, असेही पंड्याने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *