Browse By

पहा कसे ओळखायचे बनावट GST बिल. याप्रकारे आपली फसवणूक रोखू शकता.

देशात GST लागू झाल्यापासून सर्वांच्या मनात अनेक शंका आहेत. GST बद्दल योग्य ती जाहिरात होणे गरजेचे होते पण केंद्र सरकार ने त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, याचाच फायदा घेऊन काही हॉटेल मालक, दुकानदार मंडळी ग्राहकांची फसवणूक करताना दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी जगदीश लाडे यांना पुण्याच्या एका हॉटेल मध्ये असाच एक अनुभव आला तो त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे शेअर केला. त्यांनी जेंव्हा हॉटेल चे बिल पाहिले तेंव्हा त्यांना त्यामध्ये मोठी चूक दिसली. जगदीश यांनी ती चूक हॉटेल मॅनेजर यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर मॅनेजरने चूक मान्य केली.

या प्रकरणात हॉटेल मध्ये बनावट GST बिल देऊन लोकांची फसवणूक सुरू होती. पहा त्या हॉटेल चे बिल

या बिल मध्ये केंद्र सरकार चा ९% टॅक्स १२ रुपये ६० पैसे व राज्य सरकार चा ९% टॅक्स १२ रुपये ६० पैसे आणि एकूण १८% टॅक्स दाखवून २५ रुपये २० पैसे ही सर्व रक्कम बिल मध्ये लावण्यात आली होती. ही चूक सॉफ्टवेअर ची असू शकते किंवा बनावट बिल बनवून ग्राहकांची फसवणूक असू शकते.

हा झाला फसवणुकीचा एक प्रकार. हे आपण बिल वरील रक्कम, टॅक्स वगैरे ची बेरीज करून तपासू शकतो.
दुसर्‍या प्रकारात दुकानदार बनावट GST नंबर टाकून बनावट बिल देतो आणि इथे आपली फसवणूक होते.

दिल्लीतील चाटर्ड अकाऊंटंट रवी शंकर गुप्ता यांनी सांगितले, की जीएसटी रजिस्ट्रेशन केले आहे तोच दुुकानदार जीएसटी वसूल करु शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की बनावट सीएसटी बिल आणि जीएसटी क्रमांक कसा शोधून काढायचा. असे चुकीचे काम करणाऱ्याला कसे पकडायचे. तुम्ही केवळ तुमच्या मोबाईलने हे काम करु शकता.

त्या दुकानदाराला तुमच्याकडून GST वसूल करण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे तपासा.

जेंव्हा हॉटेल मध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला बिल दिले जाते तेंव्हा ते तपासून पहा. प्रत्येक बिल वर दुकानदाराला आपला GST नंबर प्रिंट करणे बंधनकारक आहे. जर बिल वर GST नंबर नसेल तर मॅनेजरशी संपर्क करा. आणि जर बिल वर GST नंबर असेल तर केंद्र सरकार च्या https://services.gst.gov.in/services/searchtp या वेबसाइट ला भेट देऊन तिथे तो GST नंबर टाका. त्या दुकानदाराची संपूर्ण माहिती आपल्या समोर येते.

याप्रकारे आपण आपली फसवणूक होण्यापसून रोखू शकता.

4 thoughts on “पहा कसे ओळखायचे बनावट GST बिल. याप्रकारे आपली फसवणूक रोखू शकता.”

 1. CJBabu says:

  मला अजून GST कलालेली नाही.
  मला सांगा जर आपण १०० रु. जेवणावर खर्च केलो तर त्यावर अतिरिक्त १८% म्हणजे एकुण ११८ रु. द्यावे लागणार का?

 2. uday chothe says:

  मी हा लेख २ वेळा वाचला.. पण माझ्या लक्षात आलं नाही कि तुम्ही बिलातली कोणती चूक दाखवत आहात… वरील बिलामध्ये कोणती चूक आहे तेच लक्षात येत नाही आहे.. कृपया नीट समजावून सांगावं..

 3. Stop Scams says:

  bill is correctly calculated. Yaha to customer ne loota Hotel walo ko.

 4. VISHAL WADASKAR says:

  EKUN 118.00 DYAVE LAGNAR ANI CHUK ASHI KI 18% N LAVTA 36% LAVLA AHE… ANI GST NO. NASLYAMULE FAKT BILACHI RAKKAM 140.00 AHE.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *