Browse By

१ नाही,२ नाही तब्बल ५ रण आऊट..’या’ मॅचच्या विकेट्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल!

सोशल मीडियावर एका क्रिकेट सामन्याचे अजब फुटेज व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की आता आयसीसीनेदेखील या सामन्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. विचित्र पद्धतीने आउट होत फलंदाज अक्षरश: आपली विकेट फेकताना या व्हिडिओत दिसत आहे.

हा सामना झाला होता संयुक्त अरब अमिरातीत. अजमन ऑल स्टार लीगच्या टी-२० मालिकेतला हा चौथा सामना होता. दुबई स्टार्स आणि शारजा वॉरियर्स या संघांमध्ये २४ जानेवारीला हा सामना झाला. शारजा वॉरियर्सने २० ओव्हर्समध्ये १३६ धावा केल्या होत्या. इतकं सोपं टारगेट असूनही दुबई स्टार संघाचे फलंदाज एकामागोमाग एक आउट होत होते. दुबई स्टार टीम अवघ्या ४६ रन्सवर ऑलआऊट झाली! विशेष म्हणजे या टीमचे ५ फलंदाज रनआउट आणि स्टंप आउट झाले.

आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटने या सामन्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा हा व्हिडिओ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *