Browse By

…म्हणून आजही शनिवार वाड्यात ऐकू येतात ‘काका मला वाचवा’ अश्या किंचाळ्या.

मराठ्यांचं साम्राज्य असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यातही भुतांचं साम्रज्य आहे, असं म्हटलं जातं. काही स्थानिकांनी तिथे ‘काका मला वाचवा’ अशा किंचाळ्याही ऐकल्या आहेत. या विदारक किंचाळ्यांमागचं कारण तुम्हाला माहितेय का?

मराठा साम्राज्याला यशोशिखरावर नेणारे पेशवा बाजीराव यांनी १७४६ मध्ये एका महलाचे निर्माण केले जो आज शनिवारवाडा म्हणून ओळखला जातो. हा वाडा पुण्यात आजही आहे. सन १८१८ पर्यंत हा वाडा पेशव्यांच्या अधिकारक्षेत्रात राहीला त्यानंतर या महलाचा मोठा हिस्सा आगीत होरपळला गेला. या वाड्याचे अनेक असे रहस्य आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत.

ही आग कशी लागली हेसुद्धा आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहेत. पण इतकेच नाही तर येथील स्थानिक लोकांच्या मते या महलात दर अमावस्येला एक आर्त हाक ऐकू येते जी म्हणते “काका, मला वाचवा”.
हा आवाज त्या व्यक्तिचा आहे ज्याची या महलात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर त्याचे प्रेत नदीत सोडून देण्यात आले होते.

असे म्हणतात की, पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे १८ व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज देतात “काका, मला वाचवा”.

पण, नारायणराव यांच्या हत्येमागे काय कारण आहे त्याचीसुद्धा एक दुःखद गोष्ट आहे.

नारायणराव नानासाहेब पेशवा यांचे सर्वात लहान पुत्र होते. त्यांच्या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशवा बनविण्यात आले होते. नारायणराव पेशवा तर बनले पण कमी वय असल्यामुळे त्यांना रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना त्यांचा संरक्षक बनविण्यात आले आणि शासन संचालकांचा कारभारही राघोबा यांच्याच हातात होता. पण या व्यवस्थेमुळे राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई फारसे खूश नव्हते. त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार हवा होता.

राघोबांच्या या मनसुब्याची भनक नारायणराव यांना लागली होती यामुळेच या दोन्ही पक्षात खूप वाद होण्यास सुरुवात झाली. यादरम्यान रघुनाथराव यांनी सुमेर सिंह गर्दी जे भिल्लांचे सरदार होते त्यांना नारायणराव यांना ताब्यात घेण्याचा हुकुम दिला. पण या पत्राला आनंदीबाईने बदलले आणि नारायणराव यांना मारण्याचा आदेश दिला. सुमेर सिंग आणि नारायणराव यांचे संबंध चांगले नव्हते, त्यामुळे सुमेर सिंहने नारायण राववर हल्ला केला.

नारायणराव काका मला वाचवा असे ओरडत शनिवारवाड्यात पळत होते आणि ते त्यांचे अखेरचे शब्द ठरले. सुमेर सिंहने त्यांच्यावर तलवारीने वार करत नारायणरावचे प्राण घेतले.

असे म्हणतात की, आजही नारायणरावांची आत्मा शनिवारवाड्यात आहे आणि मदतीसाठी हाक देत आहे.

2 thoughts on “…म्हणून आजही शनिवार वाड्यात ऐकू येतात ‘काका मला वाचवा’ अश्या किंचाळ्या.”

  1. Jay says:

    Ho he khara ahe mi suddha khup janankadun aikla ahe ..
    pan mala kadhich aiku alela nahiye
    lal mahalchya samor jo buruj ahe tyachya ekdum opposite side la jo buruj ahe tithun asa awaj yeto asa mazyahi kavar ala ahe dusryankadun

  2. Sudhakar says:

    Its Not true

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *