Browse By

तर यामूळे डॅन्निएल वेबर ने केले सन्नी लेओन सोबत लग्न… सत्य जाणून तूम्ही पण चकीत व्हाल…

आपला मानवीय स्वभावच असा आहे की आपण इकडून तिकडून ऐकण्यात आलेल्या गोष्टींवर अगदी सहज विश्वास ठेवतो. आता तसं पाहायला गेलं तर यात आपली काही चूक नाहीये. मनुष्य प्राण्याचा स्वभावच असा आहे की आपण जे ऐकतो किंवा पाहतो त्यालाच सत्य समजतो. सन्नी लेओन च्या बाबतीत हि आपलं तसंच मत आहे. पॉर्न स्टार ते बॉलीवूड स्टार बनलेली सन्नी पडद्यावर जशी दिसते अगदी तशीच ती तिच्या खाजगी आयुष्यात देखील असेल असे आपल्याला वाटते.

पण आपल्याला ही म्हण तर माहीत असेल की ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं’.
आणि सन्नीची कहाणी सुद्धा अशीच काही आहे. एक दिवस सनी आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर एका रेस्टोरंट मध्ये गेली होती जिथे तिची भेट झाली डॅनियल वेबर सोबत आणि त्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

लग्नाला 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत…

सन्नी लेओन आणि डॅनियल वेबर यांच्या लग्नाला जवळ जवळ 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि लग्नाच्या 9 वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या नात्यातील गोडवा आणि उत्साह तसाच टिकून आहे जो 9 वर्षांपूर्वी होता. चित्रपटाचं शूटिंग असो किंवा प्रमोशन, हे जोडपं नेहमी सोबत सोबतच असतं.

रेस्टोरंट मध्ये झाली पहिली भेट आणि पहिल्या भेटीतलं प्रेम…

सन्नी लेओन आणि डॅनियल वेबर यांची पहिली भेट झाली ती एका
रेस्टोरंट मध्ये. आणि डॅनियल ला सनी पहिल्या भेटीतच आवडली आणि तिच्या प्रेमात पडला.
सन्नी आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर सुट्टीची मजा घेण्यासाठी लास व्हेगास येथे गेली होती. त्यांनी आपला मुक्काम एका रेस्टोरंट ठेवला आणि नेमकं तेथेच डॅनियल यांची म्यूजीक कॉनसर्ट होती. त्याच दरम्यान डॅनियलची नजर सनीवर गेली आणि एका नजरेत ते सनीच्या प्रेमात पडले.

सुंदर फुलांचा गुलदस्ता…

कॉनसर्ट संपल्यानंतर डॅनियल यांनी सनीला त्यांनी नाव विचारलं आणि तेथून निघून गेले. पण यानंतर जेंव्हा जेंव्हा सनी त्या रेस्टोरंट मध्ये जायची तेंव्हा तेंव्हा तिला तिच्या नावाचा एक गुलदस्ता तिथे मिळायचा.

मुद्दाम उशीरा गेली सनी…

डॅनियल पूर्णपणे सनी च्या प्रेमात पडले होते पण सनी ला त्यांच्या मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. ह्यामुळेच जेंव्हा डॅनियल ने सनीला डेट वर बोलावलं तेंव्हा सनी मुद्दाम उशिरा गेली ज्यामुळे डॅनियल तिला नाराज होईल व तिला नापसंत करेल.

किस्मत कनेक्शन…

पण सनी जे वाट्टेल ते करो, तिच्या नशिबात तर डॅनियलचीच सोबत लिहिलेली होती. शेवटी नशीब त्यांना एकत्र घेऊनच आलं आणि त्यांच्या सुंदर नात्याला सुरुवात झाली.

मानसिक तणावा मध्ये होती सनी…

जेंव्हा डॅनियल सनी च्या आयुष्यात आले तेंव्हा सनीची एक अतिप्रिय व्यक्ती तिची ओबत सोडून गेली. सनीच्या आईचं निधन झालं. आणि यामुळे सनी खूप एकटी पडली व मानसिक तणावामध्ये होती. जर दुसरं कोणी असतं तर सनीला एकटं सोडून निघून गेलं असतं पण डॅनियल यांनी अशा कठीण वेळेमध्ये सुद्धा सनीचा हात सोडला नाही.

3 वर्षांनंतर केले लग्न…

तेंव्हा सनीच्या लक्षात आले की तिला डॅनियल पेक्षा चांगला जोडीदार शोधून सूध्दा सापडणार नाही. आणि अशा प्रकारे 3 वर्ष एक दुसऱ्या सोबत घालवल्या नंतर ते लग्नबंधनात बांधले गेले. त्यांनी आपले लग्न हे पंजाबी रीती-रिवाजांनुसार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *